Rock Balancing ची जादू – मुलं, मोठे आणि कॉर्पोरेट्सना देतोय नवा मार्ग!
“दगड गप्प असतात… पण त्यांचं संतुलन मनातली असंतुलन उघड करतं!”
आजच्या धावपळीच्या जीवनात, एकाग्रता, संयम आणि आंतरिक शांतता हे शब्द आपण विसरत चाललो आहोत. पण, अशाच एका अनोख्या कलेतून हे सर्व पुन्हा शोधता येतं — आणि ती कला आहे रॉक बॅलन्सिंग!
रॉक बॅलन्सिंग म्हणजे नेमकं काय? ती ध्यानाशी कशी संबंधित आहे? ही केवळ दगड रचण्याची प्रक्रिया आहे की एक पूर्ण मानसिक साधना?
या एपिसोडमध्ये आपली भेट होते गौतम वैष्णव यांच्याशी — भारतातील आघाडीचे रॉक बॅलन्सिंग आर्टिस्ट. BBC News Marathi, TEDx सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपल्या अनोख्या दृष्टिकोनातून त्यांनी रॉक बॅलन्सिंगचा अध्यात्मिक आणि मानसिक आरोग्याशी असलेला संबंध स्पष्ट केला आहे.
आपल्या होस्ट डॉ. स्मिता करपते Health Communeच्या सह-संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली, आपण जाणून घेणार आहोत की ही कला लहान मुलांसाठी कशी उपयुक्त आहे, कॉर्पोरेट जगतात तिचा काय उपयोग होतो, आणि रोजच्या जीवनात तणाव व असंतुलनापासून मुक्त होण्यासाठी ती कशी मदत करू शकते.
या एपिसोडमध्ये चर्चा होते:
रॉक बॅलन्सिंग म्हणजे काय? आणि ती ध्यानाशी व मानसिक आरोग्याशी कशी जोडलेली आहे?
मुलांना ही कला नैसर्गिकरित्या कशी आकर्षित करते?
कॉर्पोरेट लोकांसाठी रॉक बॅलन्सिंगचा उपयोग काय?
आणि या साध्या पण खोलवर परिणाम करणाऱ्या प्रक्रियेचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर होणारा सकारात्मक प्रभाव!